हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही जर स्वस्तात मस्त 5G मोबाईल घेण्याच्या तयारीत असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठी आहे. चीनी स्मार्टफोन ब्रँड Tecno ने भारतीय मार्केट मध्ये २ नवीन 5G मोबाईल लाँच केले आहेत. Tecno Pova 7 5G आणि Tecno Pova 7 Pro 5G असं या दोन्ही मोबाईलची नावे आहेत. या दोन्ही मोबाईलच्या किमती इतर ब्रँड च्या तुलनेत कमी असल्या तरी त्यात अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. भारतीय बाजारात हे मोबाईल रेडमी, रिअलमी, poco सारख्या ब्रँडना टक्कर देतील.
Tecno Pova 7 चे स्पेसिफिकेशन:
Tecno Pova 7 मध्ये 6.78-इंचाचा HD+ रिझोल्यूशन आणि LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्पेला 144Hz रिफ्रेश रेट आणि 900 nits पर्यंत ब्राइटनेस मिळतो. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये Dimensity 7300 Ultimate प्रोसेसर बसवण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. टेक्नोहाच हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित HiOS 15 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, पाठीमागील बाजूला 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि सेकंडरी कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 13MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर साठी मोबाईल मध्ये 6,000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Tecno Pova 7 च्या 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे तर 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन काळ्या, हिरव्या आणि सोनेरी रंगात येतो.
Tecno Pova 7 Pro चे स्पेसिफिकेशन:
Tecno Pova 7 Pro मध्ये 6.78-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्पेला 144Hz रिफ्रेश रेट आणि 4,500 nits पर्यंत ब्राइटनेस मिळतो. पाणी आणि स्प्लॅशपासून संरक्षण करण्यासाठी मोबाईलला IP64 रेटिंग देण्यात आलं आहे. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये Dimensity 7300 Ultimate प्रोसेसर बसवण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. टेक्नोहाच हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित HiOS 15 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, पाठीमागील बाजूला 64MP Sony IMX682 प्रायमरी शूटर आणि 8MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आहे. तर सेल्फी साठी समोर 13MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने मोबाईलला १ वर्षाचे ओएस अपडेट्स आणि २ वर्षांचे सुरक्षा पॅचेस देण्याचे आश्वासन दिले आहे. पॉवर साठी मोबाईल मध्ये 6,000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 45W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि ३०W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Tecno Pova 7 Pro 5G च्या ८GB RAM + १२८GB स्टोरेज मॉडेलची किंमत १६,९९९ रुपये आहे तर ८GB RAM + २५६GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १७,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा मोबाईल ग्रे, गीक ब्लॅक आणि निऑन सायन रंगात उपलब्ध आहे. हे दोन्ही स्मार्टफोन १० जुलैपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध असतील.



