महाशिवरात्री निमित्त ‘लालू’ पुत्र तेजप्रतापची कमाल; व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)चे नेते तथा लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव आपल्या अतरंगी स्वभावामुळं आणि वादग्रत विधानामुळं नेहमीच चर्चेत असतात. स्वतःला कलाप्रेमी सांगणाऱ्या तेजप्रताप यांच्यात एक कलाकार दडला असल्याचा अनुभव नुकताच बिहारमधील वैशाली येथील एका कार्यक्रमात उपस्थित लोकांना आला. वैशाली येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित एका कार्यक्रमात तेजप्रताप यांनी चक्क सुरमुधुर स्वरात बासरी वाजवून सगळ्यांना अचंबित केलं. तेजप्रताप यांचा हा बासरी वाजवण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात तेजप्रताप यांनी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याबाबत वातग्रस्त विधान केलं आहे. तेजप्रताप यांनी नितीश कुमारांची तुलना भगवान कृष्णाचे मामा कंस यांच्याशी केली आहे. तेजप्रताप म्हणाले ‘ज्याप्रकारे कंसचा सर्वनाश झाला, त्याचप्रमाणे 2020च्या निवडणूकीतही नितीश यांचा सर्वनाश होईल.’ 2020 मध्ये कोणाचा वध होणार अशी विचारणा त्यांनी उपस्थित जनसमूहाला केला? यावेळी त्यांनी उपस्थितीतांकडून आपल्या प्रश्नाचे उत्तर .मागितले असता अनेकांनी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचे नाव उच्चारले.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment