सांगली प्रतिनिधी । ‘विरोधक तसेच त्यांच्या हस्तकांनी टीका करताना किमान एकमताने तरी करावी. गेल्या पाच वर्षांत मी केलेली विकासकामे, सोबतच टेंभूची पुर्ती यामुळे माझा विजय नक्की आहे हे माहित असल्यामुळेच विरोधक आणि त्यांचे हस्तक एकाच मुद्दयावर वेगवेगळी मते मांडत आहेत.’ असे सांगत शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी टेंभू योजनेचे श्रेय घेत विरोधकांवर सडकून टीका केली. बाबर हिंगणगादे येथे आयोजित प्रचारसभेमध्ये ते बोलत होते.
यावेळी आमदार बाबर पुढे म्हणाले की, ‘विरोधकाच्या प्रचारासाठी सभा घेणारे प्रत्येकजण टेंभू योजना या एकाच मुद्द्यावर मते मांडून जनतेची दिशाभूल करत आहेत. एक म्हणतो टेंभू हा निवडणूकीचा मुद्दाच होवू शकत नाही. तर दुसरा म्हणतो विरोधकांच्यामुळेच टेंभू योजना पुर्ण झाली. तर तिसरा म्हणतो कोट्यावधीचा निधी दहा वर्षात दिला. टेंभूसाठी मी रात्रीचा दिवस केला आहे.आणि जे केले आहे ते जनता जाणतेच आहे आणि तेच मी सांगतो. पण ज्यांनी ही योजना दिवास्वप्न मानले ते आज उघडपणे आम्ही केल्याचे सांगत आहेत. प्रचाराचे मुद्दे आणि त्यात एकवाक्यता नसणे हे त्यांच्या विचलितपणाचे लक्षण आहे. विरोधकांना पराजयाची चाहूल लागल्यामुळेच हा बोलण्यात विचलितपणा आला आहे’, अशी टीका ही बाबर यांनी केली.
आपल्या कार्याचा आढावा देतांना बाबर म्हणाले की, ‘मी गेली पस्तीस वर्षे राजकारण करत आहे. मी समाजकारण आणि सामान्य माणूस यांना डोळ्यासमोर ठेवून जनतेची सेवा केली आहे. मी केलेली कामे सगळ्या मतदारसंघाला माहित आहेत. मला विरोधकांवर टिका करण्याची गरज नाही. पण विरोधकांनी स्वतःच्या विकासाला प्राधान्य देवून जनतेच्या डोळ्यात धुळ फेकली आणि आता आम्हीच सगळे केल्याचे सांगत फिरत आहेत. पण त्यांनी जनतेला फसविणे बंद करावे. अन्यथा जनता ही जनार्दन असते. ती तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी विरोधकांना यावेळी दिला.
इतर काही बातम्या-
सतेज पाटलांना हरवलंय; पुतण्याला हरवणं कठीण नाही – प्रमोद सावंत
वाचा सविस्तर – https://t.co/IBGd30IEAa@satejp @satejpatilmos @INCMumbai @INCIndia #vidhansabha2019#MaharashtraAssemblyElections
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 11, 2019
राज्यात १३ ऑक्टोबरपासून मोदींचा प्रचारदौरा; ९ ठिकाणी होणार ‘मोदीगर्जना’
वाचा सविस्तर – https://t.co/fWYktNSam0@BJP4India @BJP4Maharashtra @BJPLive @PMOIndia @narendramodi @Dev_Fadnavis #MaharashtraAssemblyElections #Vidhansabha2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 11, 2019
३७० चं काय सांगता, अनुच्छेद ३७१ रद्द करा, पाठिंबा देतो ; शरद पवार यांचा भाजपला टोला
वाचा सविस्तर – https://t.co/yHkOEc0m5E@NCPspeaks @MumbaiNCP @AjitPawarSpeaks @supriya_sule #Vidhansabha2019 #MaharashtraAssemblyElections
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 11, 2019