महाराष्ट्रात पुढील 2 दिवस कडाक्याची थंडी; या भागात 10-12°c तापमानाची शक्यता

मुंबई | राज्याभर सध्या चागंली थंडी पडलेली आहे. आता पुढील दोन दिवस राज्यातील काही भागात कडाक्याची थंडी पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याचवेळी मुंबई, ठाने या भागातील तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

उत्तर-पुर्व महाराष्ट्रात 30 जानेवारी ते 31 जानेवारीच्या दरम्यान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस या भागात तापमान 10°c ते 12°c पर्यंत घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान, मुंबई व ठाणे या भागात मात्र पुढील दोन दिवसांत तापमानात वाढ होणार आहे. मुंबईचे तापमान 16°c ते 18°c पर्यंत राहण्याचा अंदाज आहे. तसेच 31 जानेवारी रोजी विदर्भाच्या उत्तर भागातील तापमानात घट होऊन ते 12°c पर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यानंतर तापमानात हळूहळू पुन्हा वाढ होईल अशी माहिती मिळाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’