हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वित्झर्लंडचा स्टार खेळाडू आणि टेनिसचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने निवृत्तीची घोषणा केली आहे. लंडनमध्ये पुढील आठवड्यात होणाऱ्या लेव्हर कपनंतर तो टेनिसला कायमचा अलविदा करेल. रॉजर फेडररने सोशल मीडियावर एक नोट पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. फेडरर जगातील सर्वात जास्त ग्रँडस्लॅम जिंकणारा तिसरा आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण 20 ग्रँडस्लॅम जिंकले. यामध्ये सहा ऑस्ट्रेलियन ओपन, एक फ्रेंच ओपन, आठ विम्बल्डन आणि पाच यूएस ओपन विजेतेपदांचा समावेश आहे.
To my tennis family and beyond,
With Love,
Roger pic.twitter.com/1UISwK1NIN— Roger Federer (@rogerfederer) September 15, 2022
सध्या मी 41 वर्षांचा आहे. मी 24 वर्षात 1500 हून अधिक सामने खेळले आहेत. टेनिसने मला खूप काही दिले आहे. आणि आता माझी स्पर्धात्मक कारकीर्द संपवण्याची वेळ कधी आली आहे हे मला ओळखावे लागेल. लंडनमध्ये पुढील आठवड्यात लेव्हर कप ही माझी शेवटची एटीपी स्पर्धा असेल. मी भविष्यात आणखी टेनिस नक्कीच खेळेन पण ग्रँडस्लॅम किंवा टूरमध्ये नाही असं रॉजर फेडररने म्हंटले.
या पत्रात रॉजर फेडररने आपल्या कारकिर्दीत योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. ज्यांनी आपली कारकीर्द यशस्वी केली त्या आपल्या कुटुंबापासून ते प्रशिक्षकापर्यंत सर्वांप्रती फेडररने आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. टेनिसचा सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेडररने आपल्या कारकिर्दीत एकूण 20 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.