Terekhol Fort : महाराष्ट्रातील ‘या’ गावात वसलाय गोव्यातील किल्ला; दोन्ही राज्यांशी आहे घनिष्ट संबंध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Terekhol Fort) आपल्या महाराष्ट्राला भव्य असा इतिहास लाभला आहे. त्यामुळे राज्यभरात अनेक ऐतिहासिक वास्तू, गडकिल्ले पहायला मिळतात. जे आजही छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे मावळे आणि मराठ्यांच्या एकंदरच इतिहासाची साक्ष देतात. आजवर तुम्ही महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात स्थित असणाऱ्या किल्ल्यांची माहिती घेतली असेल. अनेक किल्ल्यांना तुम्ही भेटदेखील दिली असेल. मात्र आज आपण ज्या किल्ल्याविषयी माहिती घेणार आहोत तो किल्ल्या महाराष्ट्र आणि गोवा बॉर्डरवर स्थित आहे. अर्थात हा किल्ला ज्या गावात आहे ते गाव जरी महाराष्ट्रात असलं तरी या किल्ल्याला राज्य मात्र गोवा लागतं. या किल्ल्याचं नाव आहे तेरेखोल.

महाराष्ट्र- गोवा बॉर्डरवरील तेरेखोल किल्ला (Terekhol Fort)

महाराष्ट्र राज्य आणि गोवा राज्याच्या बॉर्डरवर स्थित असलेला तेरेखोल किल्ला हा एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा अत्यंत अनोखा किल्ला असून हा ज्या गावात आहे ते गाव महाराष्ट्रात आहे. पण, किल्ला मात्र, गोवा राज्यात आहे. त्यामुळे तेरेखोल किल्ला पहायला महाराष्ट्र आणि गोवा दोन्ही राज्यातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. (Terekhol Fort) हा किल्ला नदी आणि समुद्राचा जिथे संगम होतो तिथेच एका टेकडीवर आहे. ज्याचे दृश्य अत्यंत लक्षवेधी आहे. शिवाय या किल्ल्यावरून समुद्राचे अतिशय विहंगम असे चित्र दिसते. जे फारच मोहक आहे. हा किल्ला आज आलिशान हॉटेलमध्ये पर्यटकांचे स्वागत करतो आहे.

तेरेखोल किल्ला बनला आलिशान हॉटेल

तेरेखोल हा किल्ला गोवा राज्यात येतो. त्यामुळे या किल्ल्यासंदर्भातील निर्णय घेण्याचा हक्क गोवा सरकारकडे आहे. (Terekhol Fort) काही वर्षांपूर्वीं गोवा सरकारने या किल्ल्याचे एका अलिशान हॉटेलमध्ये रुपांतर केले आहे. त्यामुळे आज हा किल्ला हॉटेल म्हणून जास्त प्रसिद्ध आहे.

तेरेखोल किल्ल्याचा इतिहास

महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवर असलेला तेरेखोल किल्ला हा तेरेखोल नदी जिथे समुद्राला मिळते त्या तेरेखोल खाडीच्या मुखाजवळील एका टेकडीवर बांधलेला आहे. (Terekhol Fort) १७ व्या शतकात हा किल्ला बांधल्याच्या काही नोंदी सापडल्या आहेत. यानुसार, सावंतवाडीच्या खेमसावंतांनी पोर्तुगिजांवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची उभारणी केल्याचे समजते. याशिवाय १७९४ मध्ये काही काळ हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. मात्र, त्यानंतर पोर्तुगिजांनी हा किल्ला जिंकून घेतल्याचे देखील याद नमूद केले आहे.

कसे जाल?

मालवण – पणजी कोस्टल रोडवरच तेरेखोल गाव आहे. हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात येते. मात्र, या गावातील तेरेखोल किल्ला हा पेडणे तालुक्यात येतो. (Terekhol Fort) जो उत्तर गोव्याचा भाग आहे. मालवणपासून ६० तर पणजीहून ४० किमी अंतावर हे गाव असून मालवणहून वेंगुर्ले आणि वेंगुर्ल्याहून बसने येथे जात येते. तेरेखोल गावातून या किल्यापर्यंत जाण्याचा रस्ता आहे.