नवी दिल्ली । टर्म इन्शुरन्स कौटुंबिक आणि इतर आर्थिक गरजांसाठी आवश्यक बनला आहे. कोरोना महामारीनंतर आर्थिक दृष्टीकोनातून ते जीवनासाठी खूप महत्वाचे झाले आहे. सध्याच्या काळात टर्म इन्शुरन्स जास्त लोकप्रिय होत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे विमाधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास, ते त्याच्या कुटुंबाला भक्कम आर्थिक पाठबळ देते आणि तेही अत्यंत कमी प्रीमियममध्ये.
कमी प्रीमियममध्ये जास्त कव्हरेज असल्यामुळे टर्म इन्शुरन्स हा झपाट्याने पसंतीचा पर्याय बनत आहे. विमा कंपन्याही स्पर्धात्मक दरात ते देत आहेत. ही पॉलिसी खरेदी करताना सहसा मेडिकल टेस्ट करावी लागते. काही कंपन्या मेडिकल टेस्टमध्ये शिथिलता आणू शकतात, मात्र क्लेमच्या वेळी ते तुम्हाला महागात पडू शकते.
नो चेकअप पॉलिसी खरेदी करणे टाळा
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशी पॉलिसी घेणे टाळावे, ज्यात खरेदी करण्यापूर्वी संपूर्ण मेडिकल चेकअप होत नाही. जर संपूर्ण वैमेडिकल चेकअप नसेल तर पॉलिसी खरेदी करताना विमाधारकाला थोडासा दिलासा मिळतो, मात्र क्लेमच्या वेळी यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यांना सहजासहजी क्लेम मिळत नाहीत.
…तर कंपन्या क्लेम देत नाहीत
टर्म प्लॅन कमी प्रीमियमवर जास्तीत जास्त कव्हरेज देतात. अशा परिस्थितीत विमा कंपन्या पॉलिसी विकण्यापूर्वी मेडिकल टेस्ट घेतात. मात्र, काही प्रकरणांमध्ये, विमा कंपन्या यासाठी आग्रह धरत नाहीत आणि केवळ विमाधारकाच्या वतीने चांगल्या आरोग्याचे डिक्लेरेशन दिल्याने काम पूर्ण होते. मात्रविमाधारकाने ते टाळावे. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे पॉलिसी खरेदी केल्यानंतर काही कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, अनेक वेळा विमा कंपन्या माहिती लपविण्याच्या आधारावर क्लेम नाकारू शकतात. विमा कंपन्या असा युक्तिवाद करू शकतात की, विमाधारकाने पॉलिसी खरेदी करताना आपल्या आरोग्याची अचूक माहिती दिली नाही. त्यामुळे क्लेमची रक्कम मिळणार नाही.
विमा कंपनी जबाबदार आहे
टर्म इन्शुरन्स प्लॅन घेण्यापूर्वी तुम्ही मेडिकल टेस्ट केली तर मेडिकल रिपोर्टची जबाबदारी विमा कंपनी आणि तपासणी करणाऱ्या डॉक्टरांवर येते. अशा परिस्थितीत, पॉलिसीधारकाच्या नॉमिनीला क्लेम सेटलमेंट करताना फारशा अडचणी येत नाहीत. केवळ एक टर्म इन्शुरन्स प्लॅन खरेदी करणे शहाणपणाचे आहे ज्यामध्ये संपूर्ण मेडिकल चेकअप करणे आवश्यक आहे.