Tesla Power India Job | टेस्ला पॉवर इंडिया करणार 2000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती, कंपनीचे आगामी उद्दिष्ट्ये केले स्पष्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tesla Power India Job | आपल्या भारतामध्ये बॅटरी बनवणाऱ्या अनेक नवनवीन कंपन्या उदयास आलेल्या आहेत. परंतु त्यातील टेस्ला कंपनी ही खूपच प्रसिद्ध अशी कंपनी आहे. आणि आता टेस्ला पावर इंडिया विविध क्षेत्रांमध्ये 2 हजारपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची भरती करण्याची तयारी करत आहे. या कंपनीने सोमवारी एक निवेदन जारी केले. आणि या निवेदनात म्हटले की, “अभियांत्रिकी ऑपरेशन विक्री आणि मार्केटिंग संबंधित विविध पदांचा समावेश आहे. आणि त्यात तरुणांना रोजगारासाठी मोठी संधी उपलब्ध आहे.’

ही कंपनी सध्या जुन्या बॅटरी दुरुस्त करून त्यांची विक्री करण्यासाठी त्यांचा बॅटरी ब्रांड रिस्टोर लॉन्च केले आहे. आणि २०२६ पर्यंत देशभरात 5000 पेक्षा जास्त रिस्क ब्रँड स्टोअर करण्याची योजना या कंपनीने आखलेली आहे. त्यामुळे आता ते 2हजार पेक्षाही जास्त लोकांची त्यांच्या कंपनीमध्ये विविध पदांसाठी भरती करत असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिलेली आहे.

भारतात करायचा आहे व्यापाराचा विस्तार | Tesla Power India Job

यावेळी टेस्ला पावर इंडियाचे प्रशासकीय संचालक कवींदर खुराना हे म्हटले की, “आम्ही भारतात आमचा व्यवसाय विस्तारत असताना नवीन प्रयोग करून आमची उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला आमच्या संस्थेमध्ये नवीन लोकांचे स्वागत करायचे आहे. त्यामुळे एक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत.”

याबरोबरच टेस्ला पावर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कवींदर खुराना यांनी मनी कंट्रोलला सांगितले की, “भारतातील शाश्वत ऊर्जा उपायांची वाढती मागणी पूर्ण करण्याच्या आमच्या निर्णयामुळे ही नियुक्ती आम्ही करण्यात आहोत. आमची क्षमता वाढवणे, नाविन्य आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपनी म्हणून आमचे स्थान बळकट करण्याचे आमचे ध्येय आहे. आम्ही करत असलेल्या या नवीन नियुक्त आमच्या वाढीला चालना देण्यासाठी आणि भारताला ऊर्जा भविष्याकडे नेण्यात योगदान देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.”

इलेक्ट्रिक वाहनांचा वाढत्या बाजारपेठांमुळे बॅटरीची मागणी वाढली

आजकाल पेट्रोल आणि डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले असल्याने भारतातील अनेक नागरिक हे इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी त्यांचा कल दर्शवतात. त्यामुळे आता भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार हळूहळू वाढला आहे.

गेल्या वर्षी 15 लाखांपेक्षा अधिक इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झालेली आहे त्यामुळे टाटा समूह स्वतः बॅटरी व्यवसायात मोठी गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळ हा बॅटरी उद्योजकांसाठी खूप चांगला काळ असू शकतो. आणि आर्थिक भरभराट देखील होऊ शकतो असे त्यांनी मत व्यक्त केलेले आहे. त्यामुळेच ते त्यांच्या कंपनीमध्ये आता मोठ्या पदांची भरती सुरू करणार आहेत.