नवी दिल्ली । Elon Musk ची कार कंपनी Tesla Inc ने भारतातील नेतृत्व आणि वरिष्ठ स्तरावरील भूमिकांसाठी भरती सुरू केली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, इलेक्ट्रिक-कार निर्माता विक्री प्रमुख, मार्केटिंग प्रमुख आणि HR हेड शोधत आहे. टेस्लाचे सेलिब्रिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्कने यावर्षी टेस्ला भारतात एंट्री करणार असल्याची पुष्टी केली आहे.
मस्कची योजना काय आहे ते जाणून घ्या
मस्क ने एका रिपोर्टला उत्तर देताना ट्विट केले होते कि,” भारतात ऑफिस, शोरूम आणि कारखाना उघडण्याबाबत अनेक कंपन्यांशी चर्चा केली जात आहे.” कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारी महिन्यात सांगितले की, टेस्ला यांनी कर्नाटकची निवड भारतातील पहिल्या प्लांटसाठी केली आहे. अशा बातम्या आल्या आहेत की, टेस्लाने भारताची इन्वेस्टमेंट प्रमोशन बॉडी इन्वेस्ट इंडियाचे माजी कार्यकारी मनुज खुराना यांना नोकरी आणि व्यवसायाचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्त केले होते.
दिल्ली, मुंबई मध्ये उघडणार शोरूम
कंपनीने निशांतला चार्जिंग मॅनेजर म्हणून नेमले आहे, जो टेस्ला इंडियासाठी सुपरचार्जिंग, डेस्टिनेशन चार्जिंग आणि होम चार्जिंग व्यवसायाचे नेतृत्व करेल. टेस्ला फॅन क्लबने गेल्या आठवड्यात ट्विट केले होते की,” कंपनीने वरिष्ठ कायदेशीर सल्लागार आणला आहे.” मीडिया रिपोर्टनुसार, दिग्गज इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनी राजधानी नवी दिल्लीमध्ये शोरूम आणि सर्व्हिस सेंटर उघडण्यासाठी, पश्चिमेकडील आर्थिक केंद्र मुंबई आणि दक्षिणेस टेक सिटी बेंगलुरू मध्ये 20,000-30,000 चौरस फूट क्षेत्रातील कमर्शियल प्रॉपर्टीज शोधत आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group