सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 793 जण बाधित आढळले आहेत. रात्री आलेल्या तपासणी अहवालात तपासणी व बाधित कमी असून कोरोना पाॅझिटीव्ह रेट वाढलेला आहे. कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट 29.23 टक्क्यांवर गेल्याने चितेंचे वातावरण कायम असून ते वाढताना दिसत आहे.
गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 2 हजार 713 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 793 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 29. 23 टक्के आला आहे. रविवारी दिवसभरात 365 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्याचा बाधितांचा आकडा सध्या 2 लाख 59 हजार 385 एवढा झाला आहे.
सातारा जिल्ह्यात आजपर्यंत 2 लाख 46 हजार 468 जण कोरोनामूक्त झाले. तर आज पर्यंत 6 हजार 512 जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 24 लाख 33 हजार 135 जणांचे नमूने घेण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यात 4 हजार 573 अॅक्टीव रूग्ण आहेत. सध्या 5 रूग्ण गंभीर असून 215 रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत.