कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
ढेबेवाडी विभागात महसूल विभाग, ढेबेवाडी, मंद्रुळकोळे ग्रामपंचायत, पोलीस, प्रशासन विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र सणबुर यांच्या अंतर्गत विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपीड चाचणी केली जात आहे. एका तासात 61 जणांची कोरोना चाचणी केली, त्यापैकी 4 जण कोरोना पाॅझिटीव्ह आले. कोरोना पाॅझिटीव्ह येणाऱ्यांना ॲम्बुलन्समध्ये बसवून ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी येथे घेऊन जाण्यात आले. त्यामुळे रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांनी टेस्टची चांगलीच धास्ती घेतली आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. संचारबंदीच्या काळात सर्वच यंत्रणांनी समन्वय साधून काम करण्याच्या सुचना तहसीलदार योगेश्वर टोपे यांनी दिल्या आहेत. शुक्रवारी सकाळी ढेबेवाडीमध्ये गर्दी झाल्याचे चित्र होते. यावेळी ग्रामपंचायत सरपंच अमोल पाटील, ढेबेवाडी सरपंच विगावे, सर्कल प्रवीण शिंदे, पी.एस आय माने, पोलीस पाटील विजय लोहार, गोपनीय नवनाथ कुंभार, पोलीस प्रशासन, डॉ.सुनील जाधव, डॉ.कोमल लोकरे, के.सी तडवी, शंतुनो पाटील, स्वनिल सुतार, डॉ.बंडू गोडेकर, बर्डे मॅडम, मेघा मराठे, एस एस चोपडे, विद्या कारंडे व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
ढेेबेवाडी परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या दिसून आल्याने तहसीलदार यांनी विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपीड अँन्टीजन चाचणी करण्याच्या सुचना दिल्या. नागरिकांनी विनाकारण ढेबेवाडीमध्ये फिरू नये व मास्कचा वापर करावा. अनेक नागरिक ढेबेवाडी चालू आहे का बंद आहे, हे बघण्यासाठी फिरताना आढळून आले आहेत. इथून पुढे जे नागरिक ढेबेवाडीमध्ये विनाकारण फिरताना आढळतील त्यांची चाचणी केली जाणार आहे. यात पायी फिरणारे, दुचाकी, चारचाकी वाहनांमध्ये फिरणाऱ्यांनाही थांबवून त्यांच्या चाचण्या केल्या. याशिवाय मास्क न घालता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे विनाकारण फिरणाऱ्यांना आळा बसणार आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा