शहीद जवान संदीप सावंत यांच्या कुटुंबियांना ठाकरे सरकारची 50 लाखांची मदत जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । संदीप रघुनाथ सावंत हे कराड येथील जवान ३१ डिसेंबर २०१९ रोजी नियंत्रण रेषेवरील नवशेरा सेक्टर जम्मू-काश्मीर येथे शहीद झाले होते. त्यामुळे वीरजवान संदीप सावंत यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाच्यावतीने ५० लाख रुपयाची मदत जाहीर झाली आहे. ठाकरे सरकारने ही मदत देऊन सावंत कुटूंबियांना दिलासा दिला आहे.

सैन्यातील धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्रातील अधिकारी, जवान यांच्या विधवा, अवलंबितांना तसेच अपंगत्व प्राप्त झालेल्या अधिकारी व जवानांना आर्थिक मदत देण्याबाबत राज्य शासनाने कराड तालुक्यातील मुंढे येथील शहीद जवान नायक संदीप रघुनाथ सावंत यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदतीबाबत अध्यादेश जारी केला आहे. श्रीमती स्मिता संदीप सावंत (वीरपत्नी) ३० लाख रुपये, सौ. अनुसया रघुनाथ सावंत (विरमाता) १० लाख रुपये, रघुनाथ दामू सावंत (वीरपिता) १० लाख रुपये अशी एकूण ५० लाख रुपयाची वीरजवान संदीप सावंत यांच्या वारसांना आर्थिक मदतीबाबतचा आदेश राज्य शासनाने दिला आहे.

सैनिक कल्याण विभागाने २६ फेब्रुवारी २०२० च्या पत्रान्वये शासनास सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या विधवा, व अवलंबिता आर्थिक मदत देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. धारातीर्थी पडलेल्या जवानाला एकूण १ कोटी रकमेपैकी ५० लाख इतकी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता कारगिल निधीतून घेण्यात आलेल्या व राष्ट्रीयकृत बँकेत सद्यस्थितीत गुंतवण्यात आलेला रकमेच्या व्याजातून अदा करण्यात यावी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांच्यामार्फत धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या कुटुंबियांना ही मदत देण्यात येणार आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment