ठाकरे सरकारचा निर्णय! थकबाकीची रक्कम भरल्यास शेतकऱ्यांना 50 टक्के वीजबिल माफ

0
49
uddhav thackarey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कृषी पंपाच्या वीजबिलाच्या थकबाकीची रक्कम भरली तर शेतकर्‍यांना 50 टक्के वीजबिल माफी मिळणार, असा निर्णय ठाकरेंच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. त्यानंतर हे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत.

ऊर्जा विभागातील शेती विषयक धोरणं मांडण्यात आली. आज शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शनबाबत निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागात शेती पंपाची बिकट अवस्था आहे. आता 66 टक्के निधी त्यासाठी वापरण्यात येईल. 40 हजार कोटींची थकबाकी होती, त्याबाबत निर्णय घेण्यात आला.

शेतकऱ्यांची मागील 5 वर्षांची थकबाकी होती, त्याचे डीले चार्जेस माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here