धारावीला वाचवण्यासाठी ठाकरे गटाचा भव्य मोर्चा! या असतील प्रमुख मागण्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “धारावी वाचवा, मुंबई वाचवा” या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या निघणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व खुद्द शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत. परंतु या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी हा मोर्चा टी जंक्शन ते अदाणी समूहाच्या कार्यालयापर्यंत निघणार आहे. मुख्य म्हणजे या मोर्चा 14 राजकीय पक्षांचे नेते सामाजिक संस्था आणि रहिवासी सहभागी होणार आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून धारावी संबंधित अनेक प्रश्न सरकार पुढे मांडण्यात येतील.

गेल्या 19 वर्षांपासून रखडलेला धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी अदानी समूहाच्या वतीने हालचाली सुरू करण्यात आले आहेत. मात्र या प्रकल्पाला स्थानिकांनी आणि विरोधकांनी विरोध दर्शवल्यामुळे वातावरण तापले आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाला विरोध दर्शवत धारावी वाचवा या मागणीसाठी उद्या सर्व राजकीय विरोधी पक्षांचा भव्य मोर्चा मुंबईत निघणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतील. आज निघणाऱ्या या मोर्चामध्ये धारावीतील आणि धारावी बाहेरील असे एक लाख लोक सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, धारावीच्या प्रश्नांना घेऊन उद्धव ठाकरे गटांने सरकार विरोधात आणि अदानी समूहाविरोधात आक्रमकाची भूमिका घेतली आहे. धारावीच्या अनेक प्रश्नांना घेऊन उद्या धारावी वाचवा मोर्चा निघणार आहे. या मोर्चासाठी गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करण्यात येत आहे. धारावी परिसरात भगवे झेंडे तसेच बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

मोर्चातील मागण्या कोणत्या?

– विविध प्रकल्पाच्या नावाखाली धारावीमधील झोपडीधारकांना धारावीच्या बाहेर फेकण्यात आले आहे. त्यामुळे विविध विकास प्रकल्पांकरिता धारावीबाहेर गेलेल्या झोपडीधारकांची यादी जाहीर करून त्यांचे धारावीतच पुनर्वसन करण्यात यावे.

– सर्व झोपडी धारकांचे नव्याने सर्वेक्षण करून शेवटची तारीख हाच पात्रता दिनांक ठरवून सर्व निवासी आणि अनिवासी झोपडीधारकांना पात्र ठरविण्यात यावे. या सर्व निवासी व अनिवासी झोपडीधारकांची यादी जाहीर करून पुनर्विकासाचे काम करावे.

– सर्व झोपडीधारकांना ५०० चौरस फुटांचे घर मोफत द्यावे. पालिका मालमत्ता विभागाच्या चाळी व इमारतीतील रहिवाशांना ७५० चौरस फुटांचे घर मोफत देण्यात यावे.

– अनिवासी-औद्योगिक व्यापारी वापराच्या गाळेधारकांना आणि गोदाम मालकांना वापरात असलेल्या आकाराचे अनिवासी पुनर्वसन गाळे मोफत देण्यात यावे

– प्रकल्पाचा सुटसुटीत ‘मास्टर प्लान’ जाहीर करावा.

– धारावीतील झोपडीधारकांच्या भविष्याच्या खर्चाकरिता प्रति पुनर्वसन गाळा २५ लाख रुपयांची तरतूद करावी.