फडणवीस यांच्या मर्जीतील नेत्याचा ठाकरेंना फोन; भेटीसाठी वेळही मागितली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरले असताना राजकीय हालचालींचा वेग वाढला आहे. तर दुसऱ्या बाजूला हा निकाल जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे भाजपासोबत जातील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) जवळच्या व्यक्तीने उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची मोठी माहिती सूत्रांनी दिली आहे. या व्यक्तीने निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ ही मागितली असल्याचे सांगितले जात आहे.

उद्या लोकसभा निवडणुकीचे मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीनंतर देशातील राजकारणाचे चित्र स्पष्ट होईल. परंतु मतमोजणीचा निकाल येण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांच्या जवळील नेत्याने उद्धव ठाकरे यांच्याकडे उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता भेटीची वेळ मागितली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. परंतु उद्धव ठाकरे यांच्याकडून अद्याप कोणतीही वेळ देण्यात आलेली नाही. या नेत्याला उद्धव ठाकरे यांना निकाल लागल्यानंतर सदिच्छा भेट घ्यायची आहे. त्यामुळेच या नेत्याने भेटीसाठी वेळ मागितली असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, राजकिय वर्तुळात ही बातमी पसरल्यानंतर यावर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले आमदार प्रसाद लाड (Prasad Lad)यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच आपल्या भागात चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे हे त्यांनी सांगितले आहे. इतकेच नव्हे तर, “आम्ही उद्धव ठाकरेंना फोन करुन भेटीची वेळ मागितली, ही अतिशय धांद्यात खोटी आणि चुकीची माहिती पसरवल्याचा प्रयत्न केला गेला आहे. ना आम्हाला उद्धव ठाकरेंची गरज होती, ना आहे आणि ना भविष्यात कधी लागेल. निश्चितपणे कुणीतरी पर्सेप्शन करण्यासाठी ही माहिती पसरवली आहे.” असे प्रसाद लाड यांच्याकडून सांगण्यात आले आहे.