हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांच्यावर पलटवार करत माफी मागा अन्यथा 100 कोटींचा मानहानीचा दावा करणार असल्याचे म्हंटल होत. परंतु असल्या फडतूस नोटीसी आणि धमक्यांना मी घाबरत नाही असे किरीट सोमय्या यांनी म्हंटल.
राज्य सरकार म्हणजे अलिबाबा आणि चाळीस चोरांचं सरकार आहे. या घोटाळेबाजांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही. आतापर्यंत मी 11 जणांची यादी तयार केली होती आणि आता त्यामध्ये तिघांचा समावेश झाला आहे. आता माझे सहकारी आणखी तीन घोटाळ्यांवर काम करत आहेत,” असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.
दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्यानंतर कोणाचा नंबर असे विचारले असता त्यांनी विदर्भातील काँग्रेसचा एक मंत्री, शिवसेनेचा मंत्री, आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ परिवारातील एका सदस्याचा समावेश आहे,” असे सोमय्या म्हणाले.