हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ठाणे – बेलापूर महामार्गावरील पादचारी पुलाचे काम मागच्या दहा वर्षांपासन रखडले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना याचा सामना करावा लागत होता. व्यवस्थित सुविधा नसल्यामुळे पायी चलनेही कठीण जात होते. मात्र त्यास आता पूर्णविराम लागणार आहे. कारण ठाणे-बेलापूर महामार्गावरील सानपाडा – तुर्भे विभागातील या पुलाच्या कामास सुरुवात होणार आहे. या अर्धवट कामास पूर्ण करण्यासाठी बांधकाम विभागाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. पूल चांगला नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे अखेरचा उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर त्याची दखल घेण्यात आली आणि अखेर या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
2012 मध्ये करण्यात आली होती निर्मिती
सानपाडा – तुर्भे विभागातील नागरिकांना सायन – पनवेल व ठाणे- बेलापूर महामार्ग ओलांडण्यासाठी 2012 मध्ये पादचारी पुलाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र ठाणे ते बेलापूर याच मार्गांवरील काम पूर्ण करण्यात आले. आणि सायन-पनवेल महामार्गावरील मार्गिकेवर असलेल्या पादचारी पूलाचे काम अर्धवट ठेवण्यात आले.
1 कोटी 50 लाख रुपयांची मिळाली होती मंजुरी
हा पूल ओलांडून जाताना लोकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत होते. निवेदन पाठवल्यानंतर या पुलाची दखल घेण्यात आली आणि त्यानंतर 17 ऑक्टोबर 2023 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कार्यादेश जारी करण्यात आला. त्यासाठी तब्बल 1 कोटी 50 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र यावर्ती काम सुरु केले नव्हते. त्यानंतर 4 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. आणि त्यानुसार या कामाचे भूमिपूजन केले गेले. त्यामुळे अर्धवट राहिलेले हे काम लवकरच पूर्ण होईल. तसेच लोकांना होणारा त्रासही याद्वारे दूर केला जाणार आहे.