Thane Tourist Places : गजबजाटापासून दूर तरीही शहराजवळ आहेत ‘ही’ शांत ठिकाणे; जिथे मिळते क्षणभर विश्रांती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Thane Tourist Places) रोजची दगदग आणि गडबडीतून क्षणभर विश्रांती मिळावी असं प्रत्येकाला वाटतं. मात्र शहरात राहणाऱ्या लोकांना असं सुख मिळणे जरा कठीणच!! सतत धावपळ, गोंधळ, गोंगाट, प्रदूषण या गोष्टी तर शहरात राहणाऱ्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाल्या आहेत. असे असले तरीही मनावरचा आणि मेंदूवरचा ताण कमी होण्यासाठी कधीतरी थोडी विश्रांती गरजेची वाटते. त्यामुळे एखादी वन डे ट्रिप किंवा विकेंड प्लॅन करायला काय हरकत आहे. पण शहराजवळ एखादी शांत आणि निवांत जागा कुठे असेल? या प्रश्नाचं उत्तर आम्ही देणार आहोत. ठाणे शहरापासून काही अंतरावर अशी काही पर्यटन स्थळे आहेत जी तुम्हाला क्षणभर विश्रांती देऊ शकतात. चला तर या ठिकाणांविषयी माहिती घेऊया.

उपवन तलाव (Thane Tourist Places)

ठाणे शहरातील उपवन तलाव हे अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. या तलावाशेजारी गणपतीबाप्पाचे सुंदर मंदिर आहे. तसेच आजूबाजूची झाडे आणि शांत परिसर मनावरील ताण हलका करतो. खास करून पावसाळ्याच्या दिवसात उपवन तलावाचे सौंदर्य खुलून येते. आसपासचे पर्वत आणि तलावाच्या मध्ये असणारी महादेवाची मूर्ती तलावाच्या सौंदर्यात आणखीच भर घालते. या तलावाकाठी अनेक कपल्सची गर्दी दिसते. तुम्ही या ठिकाणी न केवळ शांतता तर बोटिंगचा सुद्धा अनुभव घेऊ शकता.

येऊर हिल्स

ठाणे शहरापासून सुमारे ८ किलोमीटर अंतरावर असलेले येऊर अत्यंत सुंदर ठिकाण आहे. हा संपूर्ण भाग डोंगराळ असून पावसाळ्यात येथे डोंगरांनी हिरवा शालू नेसल्याचे भासते. (Thane Tourist Places) पावसाळ्यात इथे अतिशय सुंदर हिरवळ आणि टेकड्यांचे अद्भुत सौंदर्य लक्ष वेधून घेते. इथे सायकलिंग करण्याची एक वेगळीच मजा येते.

फुलपाखरू बाग

फुलपाखरू पाहणे मनाला शांतता देते. फुलपाखराचे विविध रंग आणि त्याच भिरभिरणं आपल्याला गुंतवून ठेवते आणि या वेळात आपण आपली इतर टेन्शन कधी विसरलो ते आपलं आपल्याला कळत नाही. (Thane Tourist Places) अशा सुंदर अनुभवासाठी ठाणे शहरापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या आवळेकर गार्डनला भेट द्या. इथे हजारो झाडे आणि वनस्पतींमध्ये वेगवेगळ्या प्रजातीची फुलपाखरे आहेत. जी पाहून तुम्हाला एक वेगळा आनंद मिळेल.

अक्सा बीच

ठाण्याला जाताना रस्ते प्रवास करणार असाल तर मध्यावर तुम्हाला एक समुद्रकिनारा लागतो. ज्याचे नाव अक्सा बीच आहे. ठाण्यापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर हा समुद्र किनारा आहे. (Thane Tourist Places) जिथली शांतता तुमच्या मनावरील ताण कमी करण्यास मदत करू शकते. अरबी समुद्राच्या लाटा पाहणे आणि मऊशार शाळूत चालणे तुम्हाला अल्लग शांतता देईल.