अखेर ‘त्या’ फरार आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद | सहाय्यक फौजदाराचा हाताला झटका देऊन हातकडीसह घाटी रुग्णालयातून पळून गेलेला अट्टल गुन्हेगार शेख शकील यास जोगेश्वरी येथील एका घरातून एमायडीसीवाळूज पोलिसांनी अटक केली. सात दिवसांपासून तो पोलिसांना चकमा देत होता. पुढील कार्यवाही त्याला बेगमपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. शेख शकील शेख खरे (25 रा. संबरीदर्गा परिसर पडेगाव) असे या आरोपीचे नाव आहे.

त्यांच्या कानाच्या पाठीमागे गाठ झाली असल्याने 3 मे रोजी त्याला उपचारासाठी घाटीत नेण्यात आले होते. त्या वेळी त्याने फौजदार पवार यांच्या हाताला हिसका देऊन हातकडीसह धूम ठोकली. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली.

एमआयडीसी वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम. सावंत यांना त्याच्या खबऱ्याने माहिती दिली कि, हा आरोपी जोगेश्वरी येथील एका घरात लपून आहे. उपनिरीक्षक चेतन ओगले यांच्या पथकातील सहायक फौजदार मोहन पाटील, बंडू गोरे, यांनी त्याला सापळा रचून अटक केले.