कोरोनाबाबत तज्ज्ञांचा धक्कादायक दावा ; मे महिन्यात रुग्णसंख्या असेल पीक वर…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. दररोज नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्येने चार लाखांचा टप्पा गाठला आहे. अशा परिस्थितीत प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र तज्ञांनी एका रिपोर्टमध्ये असा दावा केला आहे की मे महिन्याच्या तिसर्‍या आणि चौथ्या आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक पाहायला मिळेल आणि या काळात देशात 35 ते 40 लाख सक्रिय रुग्ण असतील असं तज्ज्ञांनी म्हटले आहे. एवढेच नव्हे तर जितक्या झपाट्याने रुग्ण संख्या वाढली तितक्याच झपाट्याने कमी देखील होईल ही दिलासादायक बाब मानावी लागेल.

दुसऱ्या लाटे बाबत काही दावे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटे बाबत एसबीआय रिसर्च रिपोर्ट नुसार काही दावे करण्यात आले आहेत.

– दुसऱ्या लाटेत कोरोनाची ॲक्टिव रुग्ण संख्या 36 लाखांच्या आसपास असेल.
-कोरोनाची दुसरी लाट आपल्या उच्चांकावर असताना रिकवरी रेट 70.८ टक्के होईल.
-द पावर ऑफ व्हॅक्सिनेशन च्या रिपोर्ट मध्ये 30 एप्रिल ला असं म्हटलं गेलं की, रिकवरी रेट मध्ये एका टक्‍क्‍यांची घट 4.5 दिवसात होत आहे. याकरिता तब्बल वीस दिवस लागतील.
– रिकवरी रेट मधील एक टक्का कमीने सक्रिय रुग्णसंख्या १. ८५ लाखांने वाढते.
-जेव्हा दुसरी लाट पिक वर असेल तेव्हा संपूर्ण देशभरात रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असेल.
-सर्वात वाईट काळ मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत संपलेला असेल.

काय सांगते गणितीय आकडेवारी

आयआयटी कानपूर आणि हैदराबादच्या गणितीय मॉडेल नुसार कोरोना महामारीची दुसरी लाट 11 ते 15 मे दरम्यान पिक वर असेल. असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे त्या वेळी देशात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या एक ते तीस ते पस्तीस लाखापर्यंत पोहोचू शकते मे महिन्याच्या शेवटपर्यंत रुग्ण संख्या झपाट्याने घट होणार मात्र घट येण्याआधी मे च्या मध्यापर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या दहा लाखांचा वाढेल.

ब्राऊन युनिव्हर्सिटीच्या आशिष के झा यांच्या म्हणण्यानुसार रुग्णसंख्या उच्चांक कधी गाठेल हे ज्या त्या राज्यांवर अवलंबून आहे. महाराष्ट्रात आधीच रुग्णसंख्याने उच्चांक गाठला आहे तर पश्चिम बंगाल इतर राज्यांमध्ये हा उच्चांक आणखी बाकी आहे. त्यांनी म्हटलं की माझ्या मतानुसार जून महिन्यात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळतील. त्यांनी म्हटलं आहे.की रुग्णसंख्या जितक्या झपाट्याने वाढत आहेत तितक्याच झपाट्याने कमी होईल यात शंका आहे.

Leave a Comment