हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। गेली काही दशके अवकाशातील इतर ग्रहांवर जीवसुर्ष्टी आहे का? याचा शास्त्रज्ञ शोध घेत आहेत. मंगळ ग्रहावर जीवसृष्टीसाठी पोषक वातावरण असल्याचे संशोधनात दिसून आले होते. ज्याप्रकारे पृथ्वीच्या अंतरंगात दररोज हजारो बदल होत असतात. त्याप्रमाणेच विविध ग्रहांमध्ये देखील असेच बदल होत असतात. आता शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्र ग्रहावर त्यांना फॉस्फिन नावाच्या गॅसचा एक संपूर्ण मोठा ढग आढळून आला आहे. त्यामुळे पृथ्वीबरोबरच तेथे जीवसृष्टी आढळण्याची संभाव्य शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. शास्त्रज्ञांना नक्की जीव आहे की नाही याचा शोध लागलेला नाही. मात्र पृथ्वीच्या अंतरंगात असणाऱ्या बॅक्टेरियांमुळे हा गॅस तयार झाला असल्याचे ते सांगतात. जेम्स क्लर्क मॅक्सवेल यांच्या हवाई येथील दुर्बिणीतून शास्त्रज्ञांच्या या गटाला हा गॅस दिसला असून चिलीमधील Atacama Large Millimeter/submillimeter Array यांनी याला दुजोरा दिला आहे.
मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील आण्विक खगोलशास्त्रज्ञ क्लारा सौसा-सिल्वा यांनी याविषयी सांगितले की, सध्या शुक्रावर जे काही आहे तो केवळ फॉस्फिन गॅस आहे. मात्र त्यावर जीवन असू शकते ही खूप मजेशीर कल्पना आहे. हे संशोधन महत्वाचे आहे कारण जर त्यावर मानवी जीवन अस्तित्वात आहे किंवा तेथे मानवासाठी पोषक वातावरण आहे तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या आकाशगंगेत अजून यासारखे अनेक जीव आणि ग्रह असण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तविली आहे. कार्डिफ विद्यापीठातील शास्त्रज्ञ जेन ग्रीव्स म्हणतात, माझ्यासाठी हे सरप्राईज असून मला खूप धक्का बसला आहे. पृथ्वीबाहेरील कक्षात मानवी जीवन आहे की नाही हा खूप मोठा प्रश्न आहे. मागील अनेक दशके यावर संशोधन सुरु असून अजूनपर्यंत याचा शोध लागलेला नाही. फॉस्फिन हा तीन हायड्रोजन अणूंनी जोडलेला फॉस्फरस असून मानवासाठी अतिशय घातक वायू आहे.
या संशोधनात वापरल्या गेलेल्या पृथ्वी-आधारित दुर्बिणी वैज्ञानिकांना रसायनशास्त्र आणि आकाशीय वस्तूंच्या इतर वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यास देखील मदत करत आहेत. शुक्रावरील या प्रयोगासाठी शास्त्रज्ञांनी विविध घटकांवर अभ्यास केला आहे. हा ग्रह दिसायला पृथ्वीसारखाच असून आकाराने लहान आहे. शुक्र पृथ्वीहून जास्त सूर्याजवळ असल्यामुळे आकाशात नेहमी सूर्याच्या दिशेकडे दिसतो. त्यामुळेच तो पहाटे किंवा संध्याकाळी क्षितिजावर दिसू शकतो. जर तो जास्त प्रखर बनला तर दिवसाही दिसू शकतो. शुक्र हा सूर्य व चंद्रापाठोपाठ पृथ्वीवरून तेजस्वी दिसणाऱ्या चांदण्यांत तिसऱ्या क्रमांकावर आहे. शुक्र फॉस्फिनला प्रतिकूल असावा. त्याचा पृष्ठभाग आणि वातावरण ऑक्सिजन संयुगांमध्ये योग्य आहे जे फॉस्फिनसह तात्काळ प्रकिया होऊन फॉस्फिन नष्ट होतो. शुक्र ग्रह शेजारीच आणि पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे आपण त्याचा अभ्यास करू शकत असल्याचे देखील क्लारा सौसा-सिल्वा यांनी म्हटले. मागील रोबोटिक अंतराळ यानाने शुक्र ग्रहास भेट दिली होती, मात्र तेथे जीवनाची पुष्टी करण्यासाठी नवीन चौकशीची आवश्यकता असू शकते तसेच यासाठी पुढील टप्प्यातील संशोधन देखील गरजेचे आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.