औरंगाबाद | काही दिवसांपूर्वी एका मुलीची रिक्षा चालकाने छेड काढल्यामुळे मोंढा नाका चौकात तिने रिक्षातून उडी मारल्या प्रकरणी या रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या आरोपीला 14 दिवसांच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पोलिसांनी या आरोपींची चौकशी केली असता, मी तुला रामगिरी जवळ सोडणार नाही दुसरीकडे घेऊन जातो. आणि यानंतर रामगिरी जवळ सोडतो असे म्हणत वडापाव खायचा असल्यामुळे असे बोलल्याचा दावा या आरोपीने केला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार आनंद बहुलकर असे या आरोपीचे नाव होते. हे अल्पवयीन मुलगी मोंढा नाका चौकातून शिकवणी वर्गाला जात होती. तिने रिक्षाचालकाला रामगिरी हॉटेल जवळ सोडण्यास सांगितले. यावेळी तुला दुसरीकडेच घेऊन जातो असे म्हटल्यामुळे घाबरलेल्या तरुणीने रिक्षातून उडी मारली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता. यावेळी पोलिसांनी आठ तासांच्या आत या आरोपीला अटक केली. रविवारी या आरोपीला न्यायालयामध्ये हजर केले असता, 14 दिवस न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय दिला. या आरोपींची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे.