तब्बल सव्वादोन कोटींचा वाळूसाठा जप्त परवानगी नंतर होणार लिलाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वसमत : सव्वा दोन कोटींचा ब्रास वाळू साठा जप्त केल्याची घटना वसमत येथील तालुक्यात घडली आहे. तहसीलदार अरविंद बेळंगे आणि त्यांच्या पथकाने जप्त केला आहे.

वसमत तालुक्यात पूर्णा नदी आणि नाल्यातून वाळू उपसा केला जातो. वाळू उपसा करून वाहतुकीची सर्व माहिती सादर करण्याच्या सूचना तहसीलदार यांनी दिल्या होत्या. परंतु वाळू उपसाचे कंत्राट घेणार्‍या कंत्राटदारांनी ही माहिती सादर केली नाही. त्याचबरोबर वसमत तालुक्यातील सावंगी, परळी, माटेगाव आणि देऊळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर गाळ उपसा करून त्याचा साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती तहसीलदार अरविंद बेळंगे यांना मिळाली होती. या वाळूची किंमत तब्बल 2 कोटी 12 लाख रुपये आहे.

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार बेळंगे, अधिकारी किन्होळकर आहेरकर यांनी पथकाने शुक्रवारी चारही ठिकाणी जाऊन पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात वाळू साठा असल्याचे समोर आले. या पथकाने माहिती घेतल्यानंतर तब्बल चार हजार 248 ब्रास वाळूसाठा असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा वाळू साठा जप्त करून पंचनामा करण्यात आला. या वाळू साठ्याचा लिलाव करण्यासाठी परवानगी देण्याचा प्रस्ताव तहसीलदार बेळंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे.

Leave a Comment