कोळकीतील बेपत्ता 24 वर्षीय युवतीचा मृतदेह विहिरीत सापडला

फलटण | फलटण शहरातील उपनगर असलेल्या कोळकी येथील बेपत्ता असलेल्या एका युवतीने झिरपवाडी (ता. फलटण) येथील एका विहिरीत आत्महत्या केल्याची घटना समोर आलेली आहे. अनघा विष्णू नाळे (वय – 24 वर्ष, महादेवनगर, कोळकी) असे  युवतीचे नाव आहे. अनघा नाळे ही बेपत्ता असल्याची तक्रार फलटण शहर पोलिस ठाण्यात दाखल होती.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की अनघा नाळे ही बेपत्ता असल्याची तक्रार फलटण शहर पोलिस ठाण्यात दाखल होती. तिचा शोध घेत असताना, तीचे मामा व मित्र, नातेवाईक व पोलिस यांना आज मंगळवारी 28 सप्टेंबर रोजी सकाळ 7 वाजण्याच्या सुमारास झिरपवाडी गावच्या हद्दीत सित्याची पट्टी नावाच्या शिवारातील सीताराम शंकर गुंजवटे यांच्या मालकीच्या विहिरीतील पाण्यात अनघाचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

याबाबत मेघराज पोपट बोराटे (वय – 29, रा. फरांदवाडी ता. फलटण) यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केलीय. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत