सातारा तालुक्यातील बेपत्ता डाॅक्टरांचा मृतदेह ओढ्याच्या पाण्यात सापडला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या सातारा तालुक्यातील पाडळी येथील एक डाॅक्टर पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेले होते. त्या बेपत्ता झालेल्या डॉक्टरचा मृतदेह रविवारी सायंकाळी पाडळी येथीलच एका ओढ्याच्या पाण्यात आढळून आला. डॉ. पृथ्वीराज दिनकर देशमुख (वय- 51) असे मृत डाॅक्टरचे नाव आहे. बोरगाव पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बुधवारी सकाळी डॉ. पृथ्वीराज देशमुख हे पाडळी येथून बेपत्ता झाले होते. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही ते सापडले नव्हते. तेव्हा कुटुंबियांनी शनिवारी ते बेपत्ता झाल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

रविवारी सायंकाळी पाडळी गावानजीकच असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू.कॉलेजच्या इमारतीच्या पाठीमागे असलेल्या ओढ्याच्या पाण्यात त्यांचा मृतदेह असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. याची माहिती त्यांनी तात्काळ बोरगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेची बोरगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मयत म्हणून नोंद झाली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार रामचंद्र फरांदे करत आहेत.

Leave a Comment