रूसून गेलेल्या व्यक्तीचा सहा महिन्यानंतर आढळला मृतदेह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद |  पाच महिन्यापूर्वी घरातून बेपत्ता झालेल्या राजेंद्र रंगनाथ इंगळे 42 (राहणार केसापुरी ता. औरंगाबाद) कुजलेल्या अवस्थेत शनिवारी रामपुरी डोंगरात आढळून आल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. हा प्रकार आत्महत्येचा आहे की घातपात झाला आहे अद्याप समजलेले नाही आहे.

रामपुरी डोंगरामध्ये अर्जुन पवार हे शेळ्या चारण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना एका झुडपात पुरुषाचे प्रेत आढळून आले तेव्हा त्यांनी ही माहिती पोलीस पाटील काकासाहेब गुंजाळ यांना दिली. त्यानंतर दौलताबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजश्री आडे, पोलीस उपनिरीक्षक गोवर्धन चव्हाण व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. प्रेत डोंगराच्या मधात असल्याने अग्निशमन दलाच्या गाडी तिथे पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचले विनायक निमकर या जवानांसह काकासाहेब गुंजाळ यांनी प्रयत्न करून प्रेत डोंगराखाली आणले.

पण हे प्रेत कोणाचे आहे. हे अद्याप समजलेले नाही हे प्रेत ओळखणे पोलिसांना कठीण जात आहे. जवळ असलेले कपडे बूट यावरून या प्रेताची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी सुरू केली आहे. प्रेताची ओळख पटविण्यासाठी परिसरातील अनेक लोकांना घटनास्थळी बोलविण्यात आले अखेर हे प्रेत राजेंद्र याचे असल्याचे त्याच्या भाऊ शेखनाथ इंगळे यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. मात्र हा प्रकार आत्महत्येचा आहे ये कि घातपाताचा हे अद्यापही समजले नाही.

Leave a Comment