कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021-22 सालातील 48 व्या गळीत हंगामासाठीचा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ कारखान्याचे संचालक रामदास अंतू पवार व त्यांच्या सुविद्य पत्नी कांताताई रामदास पवार या उभयतांच्या शुभहस्ते, आणि महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, कारखान्यांचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक 10 ऑक्टोबर, 2021 रोजी दुपारी 3.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
सन 2021-22 या हंगामासाठी नोंदविलेल्या संपूर्ण ऊसाचे गळीत पुर्ण करण्याच्यादृष्टीने तोडणी वाहतूक यंत्रणेची पूर्व तयारी करण्यात आलेली असून, बैलगाड्या, ट्रॅक्टर गाड्या, ट्रक, ट्रॅक्टर यांचेशी करार करण्यात आलेले आहेत. कारखान्याच्या मशिनरी ओव्हरहॉलिंगची कामे पुर्णत्वास आली आहेत. ऊस उत्पादकांनी कारखान्याकडे नोंदविलेला संपूर्ण ऊस कारखान्याकडे गळीतास पाठवावा.
48 व्या बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभास सर्व ऊस उत्पादक, सभासद शेतकरी यांनी रविवार दिनांक 10 ऑक्टोबर, 2021 रोजी दुपारी 3.00 वाजता अगत्य उपस्थित रहावे, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाच्यावतीने कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी केले आहे.