कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
पुणे- बेंगलोर महामार्गावरील कराड शहराजवळ असलेल्या कोयना पुलावर ट्रक-दुचाकीच्या अपघातात 7 वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला. तर दोनजण गंभीर जखमी झाले. सोमवारी सायंकाळी 6 :15 वाजण्याच्या सुमारास हि अपघाताची घटना घडली असून ट्रकचालक पसार झाला आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड येथून सातारच्या दिशेला जाताना ट्रक (KA 48 A 2020) आणि दुचाकी (MH 50 R 4374) चा कोयना नदीच्या पुलावर मध्यभागी अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील असलेला आराध्य नितीन कुंभार (वय 7) हा मुलगा जागीच ठार झाला तर दुचाकीवरील बाळकृष्ण मारुती कुंभार (वय 70) व कुसुंबा कृष्ण कुंभार (वय 65) हे गंभीर जखमी झाले.
कराड : ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले; 7 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू pic.twitter.com/QyEy4fBvFm
— santosh gurav (@santosh29590931) December 26, 2022
जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तात्काळ घटनास्थळी हायवे पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा, कोयना वसाहतीचे पोलीस पाटील फिरोज मुल्ला तसेच कराड शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रशांत जाधव व खालील इनामदार हे दाखल झाले. तसेच पोलिसांच्या मदतीने अपघातात जखमींना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.