औरंगाबाद | स्वतःची ओळख मिटवित एका कम्प्युटर इंजिनियरने कर्जमुक्तीसाठी त्याच्या रूम पार्टनरचे गुप्तांग कापून ओळख पटू नये म्हणून पहिले चेहरा जाळला, नंतर मृतदेह विहिरीत टाकून खून केल्याची घटना शनिवारी वाळूज जवळ घडली आहे. त्याचबरोबर मृतदेहाशेजारी स्वतः ची कागदपत्र ठेऊन आरोपी पसार झाला असून वाळूज पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सुधाकर वारंगणे (वय-25) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. आणि मोहम्मद जुबेर जकीर हुसेन असे आरोपीचे नाव आहे. लिंबेजळगाव येथील एका विहिरीत शनिवारी एका तरुणाचा मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यानंतर वाळूज पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अग्निशमन विभागाच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. अर्धवट जळालेल्या अवस्थेत गुप्तांग कापलेले, डोके आणि तोंडावर दगडाने ठेचलेले अशा अवस्थेत हा मृतदेह आढळून आला.
त्याच्या शेजारी असलेल्या कागदपत्रांमधील आधारकार्डवर मोहम्मद जुबेर जाकीर हुसेन (रा. फिरोझाबाद, उत्तरप्रदेश) असे नाव लिहिले होते. त्यानंतर पोलिसांनी डायरीवरील मोबाईल नंबरवर संपर्क साधून झालेल्या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच मोहम्मद हुसेन यांचे वडील औरंगाबादेत दाखल झाले. आणि त्यांनी मृतदेहाची पाहणी करत, हा मृतदेह माझ्या मुलाचा नसून इतर कोणाचा असल्याचे सांगितले, त्यानंतर वाळूज पोलिसांनी मृतदेहाच्या फोटोची पोस्ट व्हायरल केली असता, मयताच्या भावाने दोन वर्षापूर्वी झालेल्या अपघातातील जखमावरून ओळखत सुधाकर वारंगणे हा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात शुक्रवारी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुधाकर हा कंपनीत कामाला होता. तो आरोपी, मृत झालेला इसम आणि अजून दोघांसोबत रूम करून राहत होते. आरोपी हा इतर दोन अश्या तीन जनासोबत खोली करून राहत होता. दोन जून रोजी मयत सुधाकर व इतर तिघे कामावर जाण्यासाठी रिक्षात बसून निघाले होते. दरम्यान रूम मध्ये आरोपी मोहम्मद रिजवान थांबला होता. कामावर जात असताना सुधाकरचा पाय दुखत असल्याने तो रूमवर परत आला. इतर सर्वजण मात्र कंपनीत कामासाठी गेले. त्याचवेळी मोहम्मदने सुधाकरला मारहाण करून त्याचे गुप्तांग कापले, त्याची ओळख पटू नये यासाठी चेहरा जाळून मृतदेह विहिरीत टाकला. यानंतर आरोपीने स्वतः चे मोहम्मद जुबेर जाकीर हुसेन नावाचे उल्लेख असलेले आधार कार्ड व डायरी टाकून घटनास्थळावरून पसार झाला. वाळूज पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.