हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अवघे तीन दिवस अर्थसंकल्प सादर (Budget 2024) करण्यासाठी राहिले आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये कोणते मुद्दे मांडण्यात येतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात रोजगाराच्या संधी, वाढती महागाई रोखण्यासाठी उपाययोजना, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा मुद्द्यांवर जास्त भर देण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पुढील काही मुद्दे देखील केंद्रस्थानी ठेवले जातील, असा अंदाज बांधला जात आहे. ते मुद्दे नेमके कोणते असतील. जाणून घेऊयात.
शेतकरी सन्मान निधीत वाढ होणार? (Budget 2024)
1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात (Budget 2024) शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. कारण आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी किंवा पीएम-किसान योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करू शकते. त्यामुळे योजनेचे वार्षिक रक्कम सहा हजारावर 9 हजार होऊ शकते. त्यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.
महागाई कमी होणार?
यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget 2024) महागाईचे प्रमाण कमी करण्यावर केंद्र सरकार जास्त भर देईल. तसेच एलपीजी सिलेंडरच्या किमती देखील कमी केल्या जाऊ शकतात. तर खाद्यपदार्थ तेलाच्या किमती यामध्ये देखील घसरण होऊ शकते. कारण कोरोना काळापासून नागरिक महागाईच्या अडचणींना सामोरे जात आहेत. त्यामुळे निवडणुकांपूर्वी केंद्र सरकार नागरिकांना मोठा दिलासा देऊ शकते. केंद्र सरकारने या संबंधित निर्णय घेतल्यास याचा फायदा त्यांना निवडणुकीच्या काळात होण्याची शक्यता आहे.
रोजगाराच्या संधीत वाढ होणार?
सध्या राज्यामध्ये रोजगाराच्या शोधात असणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अशा तरुणांसाठी केंद्र सरकार नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ शकते. मात्र देशातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे सरकार पुढे मोठे आवाहन आहे. या आव्हानाला सरकार कसे तोंड देईल आणि तरुणांसाठी कशा पद्धतीने रोजगार उपलब्ध करेल हे पाहणे अर्थसंकल्पात (Budget 2024) महत्त्वाचे ठरेल.