सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
खटाव तालुक्यातील पडळ येथील साखर कारखान्यावर काही दिवसांपूर्वी घडलेल्या अधिकारी मृत्यू प्रकरणी कारखाना चेअरमन माजी आमदार प्रभाकर घार्गे व मनोज घोरपडे यांच्या वरील खुनाच्या गुन्ह्यातफेर विचार करावा, अशी माहिती माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खटाव तालुक्यातील वडूज येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खटावचे माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर बोलत होते. यावेळी जीवन पुकळे, अशोक काळे, प्रा अजय शेटे, अंकुश दबडे आदींची उपस्थिती होती.
एखाद्या व्यक्ती ला गंभीर स्वरूपात मारहाण करणं, मोठा गुन्हा आहेच. त्याबद्दल कोणाची दया नको, परंतु गुन्हा घडला त्या वेळी माजी आमदार घार्गे व मनोज घोरपडे सामाजिक कामात होते. तसेच कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिले ही वेळेत दिली आहेत. केवळ चेअरमन व व्हॉईस चेअरमन आहेत, म्हणून खुनाचा गुन्हा दाखल आहे. याचा फेरविचार करावा, असंही डॉ. येळगावकर यावेळी म्हणाले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा