सावधान! आरोग्यासाठी ही पेनकिलर ठरतीये सर्वात धोकादायक; केंद्र सरकारकडून अलर्ट जारी

pain killer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अंगदुखी, डोकेदुखी अशा काही वेदना होऊ लागल्या की आपण डॉक्टरांकडे जाण्याऐवजी पेन किलर खाण्याचा मार्ग वापरतो. परंतु अशाच एका पेनकिलर संदर्भात केंद्र सरकारने अलर्ट जारी केला आहे. मेफ्टल पेन किलर ही आरोग्यासाठी घातक असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. भारतीय फार्माकोपिया कमिशन (IPC) ने या पेन किलर संदर्भात सतर्कता जारी केली आहे.

प्रत्येकाच्या घरात वापरल्या जाणाऱ्या मेफ्टल वेदनाशामक औषधाबाबत सरकारने महत्वाचे निर्देश जारी केले आहेत. भारतीय फार्माकोपिया कमिशन (IPC) ने जारी केलेल्या निर्देशात म्हटले आहे की, मेफ्टलमध्ये असलेलं मेफेनामिक अॅसिड आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कालांतरानं या औषधामुळे गंभीर दुष्परिणामांचाही सामना करावा लागू शकतो. मेफ्टलच्या सेवनानं इओसिनोफिलिया आणि सिस्टीमिक लक्षणे सिंड्रोम (DRESS) होऊ शकतो.

मेफ्टल पेनकिलर औषध प्रिस्क्रिप्शनशिवाय विकले जाणारे ओटीसी उत्पादन नाही. पण तरी देखील मासिक पाळीच्या वेदना, डोकेदुखी आणि स्नायू आणि सांधेदुखीपासून आराम मिळण्यासाठी हे पेन किलर खाण्यात येते. तसेच जास्त ताप जाणवल्यास लहान मुलांना देखील मेफ्टल औषध दिले जाते. मात्र पुढे जाऊन या औषधामुळे रुग्णांवर गंभीर परिणाम जाणवू शकतात असे IPC ने म्हणले आहे. त्यामुळे कोणतेही औषध वापरण्यापूर्वी त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम जणावेत आहेत.

दरम्यान, IPC ने आरोग्य सेवा तज्ञ, रुग्ण आणि ग्राहकांना सल्ला दिला आहे की, जर मेफ्टल औषधाच्या सेवनाने कोणतेही प्रतिकूल परिणाम दिसले तर त्यांनी ताबडतोब त्याचे सेवन थांबवावे. तसेच अधिक काही वाढल्यानंतर योग्य उपचार सेवा घ्यावी.