जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी काही तुटेना; आज तब्बल 342 रुग्णांची भर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 342 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 10592 आता झाली आहे. आज दिवसभरात 280 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात आतापर्यंत 7016 रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 3082 रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत 493 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे – जळगाव शहर 61, जळगाव ग्रामीण 16, भुसावळ 20, अमळनेर 23, चोपडा 22, पाचोरा 44, भडगाव 9, धरणगाव 16, यावल 16, एरंडोल २२, जामनेर १९, रावेर १०, पारोळा 3, चाळीसगाव 28, मुक्ताईनगर 15, बोदवड 2  अशी रूग्ण संख्या आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोना  बाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले 66% वर पोहचले आहे.  जिल्ह्यात कालपर्यंत 10249 बाधित रुग्णांपैकी 6736 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.दिवसागणिक रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे ही समाधानाची बाब जरी असली तरी अजूनही कोरोना विषाणूची साखळी कुठे तुटलेली दिसत नाही आहे.

दिवसेंदिवस संख्या ही वाढती असल्याने जिल्ह्यावासीयांनी आता काळजी पूर्वक दैनंदिन व्यवहार व देवाणघेवाण तसेच शासनाने सांगितलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे असणार आहे.


Leave a Comment