औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 41 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 12,तर ग्रामीण भागातील 29 रुग्णांचा समावेश असून 3 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 46 हजार 941 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 158 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आज पर्यंत 3471 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 34 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये औरंगाबाद शहरातील उल्कानगरी अलोकनगर याठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण तर संजयनगर, सातारा परिसर आणि इतर प्रत्येकी 4 रुग्ण आढळले आहे.
ग्रामीण भागातील गंगापूर कन्नड येथे प्रत्येकी एक तर औरंगाबादेतील फुलंब्री मध्ये 1, वैजापूर 8 आणि पैठण येथील 2, खुलताबाद 1, गंगापूर 9 रुग्ण आढळले आहे. उपचार सुरु असताना कन्नड येथील 65 वर्षीय पुरुष, बेगमपुरा येथील 65 वर्षीय महिला, रहिमनगर येथील 65 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला आहे.