Tuesday, January 31, 2023

सहकारीच करीत होता असे काही की शिक्षिकेने संपविले जीवन

- Advertisement -

औरंगाबाद | वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या विवाहतेच्या लग्नाआधी सोबत काढलेले फोटो तुझ्या नवऱ्याच्या व्हाट्सअपवर पाठवेल अशी सतत धमकी देत होता. या सततच्या धमक्यांना कटाळून विवाहतेने अधिक प्रमाणात गोळ्यांचे सेवन करून आत्महत्या केली. उपचारादरम्यान 2 जुलै रोजी मृत्यू झाला. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी आणि गोळ्या घेतल्याचा व्हिडिओ समोर आल्याने सातारा ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक शेळके (रा. देवळा, तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड) असे आरोपीचे नाव आहे . दिपाली किरण सोमवंशी ( रा. अरुणोदय कॉलनी ,बायपास ) असे मृत महिलेचे नाव आहे. सोमवंशी आणि दिपाली यांचा विवाह वर्षभरापूर्वीच झाला होता. लग्नाआधी आरोपी मित्र होता. दिपालीला सतत कॉल करायचा आपले फोटो तुझ्या पतीच्या व्हाट्सअपवर पाठवून देईल तुला बरबाद करेल अशा धमक्या तिला सतत द्यायचा. या त्रासाला कंटाळून तिने 1 जुलै रोजी बीपीच्या गोळ्या जास्त प्रमाणात घेतल्या. आणि कोणालाही सांगितले नाही. काही वेळाने ती स्वयंपाक करायला किचनमध्ये गेली असता तिथे चक्कर येऊन पडली.

- Advertisement -

नातेवाईकांनी तिला शिवाजीनगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांनतर अधिक उपचारासाठी आकाशवाणी चौकातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. तेथे उपचार सुरू असतांना तेथे उपचार सुरू होते, मात्र तिथल्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिला शिवाजीनगर येथील आनंदी हॉस्पिटलमध्ये 2 जुलै रोजी परत दाखल केले. तेव्हा तिची प्रकृती अधिकच खालावली होती. आणि उपचारा दरम्यान दुपारी 2 वाजता तिचा मृत्यू झाला डॉक्टरांनी सांगितले.