लसीकरण झाले तर दोन महिन्यात कोरोना संपेल ; मनपा प्रशासकांचे मत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोना रुग्ण वाढत आहे. यामुळे इच्छा नसतानाही शहरात अंशत: लॉक डाऊन सुरू करण्यात आले. शहरात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला तर दोन महिन्यातच कोरोना संपेल. असे मत मनपा प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय यांनी व्यक्त केले. शुक्रवारी लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणा (नेत्र रुग्णालय) व माजी नगरसेवक राजू शिंदे यांच्या, संयुक्त विद्यमाने आयोजित कोरोना लसीकरण सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना पाण्डेय म्हणाले, नुकत्याच झालेल्या क्वालिटी ऑफ हेल्थ मध्ये शहराला चांगले मानांकन मिळाले आहे. परंतु शहरात मराठवाड्यासह नगर, जळगाव, धुळे आदी ठिकाणाहूनही रुग्ण उपचाराकरिता दाखल होत आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेवर उपचार करताना मर्यादा पडतात. यामुळे इच्छा नसतानाही अंशत: लॉक डाऊन करावा लागला. भविष्यात आणखी कठोर पावले उचलावी लागणार आहेत. संस्थेच्यावतीने नागरिकांना मोफत लसीकरण केले जाणार आहे.

शहरात सध्या ते २३ ठिकाणी लसीकरण केले जात आहे. लायन्स नेत्र रुग्णालय हे २४ वे केंद्र ठरणार आहे. यावेळी आमदार अतुल सावे,अध्यक्षपदी क्लब चे अध्यक्ष संजीव गुप्ता, महानगरपालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर , डिस्ट्रिक्ट कॅबिनेट सेक्रेटरी राहुल औसेकर , प्रकल्प प्रमुख रीजन चेअर पर्सन राजेश जाधव ,हॉस्पिटल कमिटी को चेअरमन प्रकाश गोठी रीजन चेअर पर्सन राजेश लहुरिकर, गजानन झालवार, दीपा भारुका , राजेश शुक्ला , हॉस्पिटल चे कार्यकारी अधिकारी डॉ. प्रीतेश सोनार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्विते साठी राजेश भारुका , प्रकल्प प्रमुख रिजन चेअर पर्सन राजेश जाधव आणि सर्व लायंस सदस्यानी प्रयत्न केले. कल्याण वाघमारे यांनी सूत्रसंचालन तर सचिव विनोद चौधरी यांनी आभार प्रदर्शन केले.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment