हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 1 नोव्हेंबरपासून रिलायन्स इंडस्ट्रीजचा देशातील सर्वात मोठा लक्झरी शॉपिंग मॉल सुरू होणार आहे. ‘Jio World Plaza’ नावाचा कंपनीचा हा मॉल मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 7,50,000 स्क्वेअर फूटमधल्या परिसरात उभारण्यात आला आहे. या मॉलमध्ये बुल्गारी, कात्याय, लुई व्हिटॉन, व्हर्साचे, व्हॅलेंटिनो, मनीष मल्होत्रा, अबू जानी, संदीप खोसला, पॉटरी बार्न अशा सर्व ब्रँड्सच्या महागड्या वस्तू उपलब्ध असतील. हे बुल्गारीचे भारतातील पहिले स्टोअर असेल.
सध्या भारतात काही मोजकेच मॉल्स आहेत. जिथे फक्त आलिशान आणि महागड्या वस्तू मिळतात. यामध्ये डीएलएफ एम्पोरियो, चाणक्य मॉल, यूबी सिटी आणि पॅलेडियम यांचा समावेश आहे. परंतु आता रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ‘Jio World Plaza’ मॉलमध्ये देखील देशातील सर्वात महागड्या आणि उत्तम ब्रँडच्या वस्तू मिळतील. या मॉलमध्ये तुम्हाला सर्व सुविधा पुरवल्या जातील. त्यामुळे कोणत्याही ग्राहकाला या मॉलमधून बाहेर येताना रिकाम्या हाती यावे लागणार नाही.
याबाबतची माहिती देत CBRE मधील रिटेल प्रमुख (इंडिया) विमल शर्मा यांनी म्हणले आहे की, “भारतातील लोक आता पहिल्या सारखे राहिले नाहीत जे फक्त परदेशात एक्सप्लोर करण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी मॉलमध्ये जात होते. आता ते भारतातही महागड्या वस्तू खरेदी करत आहेत. भारत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या मालाच्या किंमतीतील तफावतही कमी झाली आहे”
दरम्यान, भारतात महागड्या आणि ब्रांडेड वस्तू वापरणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढत चालले आहे. कोविडच्या काळानंतर लोकांच्या मागणीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 2023 मध्ये देशातील महागड्या वस्तूंची बाजारपेठ 7.74 अब्ज डॉलर्सची होती. आताच्या घडीला लोक सर्वात जास्त पैसा हा ब्रँडेड वस्तूंवर खरेदी करत आहेत. त्यामुळे ‘Jio World Plaza’ हे अशा लोकांसाठी आकर्षित केंद्र बनेल.