अभिनेता योगेश सोहनीला लुटणारा गुन्हेगार अटकेत; पोलिसांचे मानले आभार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या शनिवारी मुलगी झाली हो मालिका फेम अभिनेता योगेश सोहनी ला मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वार अज्ञातांनी लुटले होते. दरम्यान गाडीत तो एकटाच असून त्याची फसवणूक करीत चोराने तब्बल ५० हजारांची लूट केली असल्याचे समोर आले होते.  आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावर त्याने शिरगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाबाबत सखोल चौकशी करण्यासाठी पिंपरी- चिंचवड विभागाचे पोलीस कमिशनर श्री. कृष्ण प्रकाश यांनी प्रत्यक्ष दखल घेतली. यामुळे अगदी आठवड्याभरातच पोलिसांनी योगेशला लुटणाऱ्या गुन्हेगारास जेलची हवा दाखवली आहे.

https://www.instagram.com/p/CO2WEJ2J52s/?utm_source=ig_web_copy_link

योगेशने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये पोलिसांचे आभार मानले आहेत. त्याने लिहिले कि, माझ्या बाबतीत घडलेल्या प्रकारात, पिंपरी-चिंचवड या भागाचे पोलीस कमिशनर श्री. कृष्ण प्रकाश यांनी स्वतः लक्ष घालून मला योग्य तो न्याय मिळवून दिल्याबद्दल प्रत्यक्ष जाऊन त्यांचे आभार मानले. या फोटोत योगेश पिंपरी चिंचवड भागाचे पोलीस कमिशनर श्री. कृष्ण प्रकाश यांना पुष्पगुच्छ देताना दिसत आहे.

https://www.instagram.com/tv/CO17pPFJvuH/?utm_source=ig_web_copy_link

योगेशला धाक दाखवून लुटणाऱ्या या सराईत गुन्हेगाराला पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपीचे नाव योगेश सुरेश गिरी असे आहे. त्याचे वयोवर्ष ३७ असून तो कात्रज येथील नऱ्हे आंबेगाव येथील रहिवासी आहे. ८ मे रोजी योगेश आपल्या कारमधून पुणे मुंबई द्रुतगती मार्गाने मुंबईहून पुण्याकडे जात होता. दरम्यान सोमाटणे उड्डाण पुलाजवळील बाह्यमार्ग येथे मोटारीवर आलेल्या आरोपीने त्याला हाथ दाखवत थांबविले. तुझ्या गाडीने अपघात झाला आहे. त्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे, असे खोटेनाटे त्याला सांगितले. याबाबत आम्ही पोलिसात तक्रार देऊ. आम्ही असे करायला नको असेल तर आम्हाला सव्वा लाख रुपये दे. अशी मागणी त्याने योगेशकडे केली.

https://www.instagram.com/p/CNtrKwtJs1T/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान योगेश एकटाच असल्याने पुरता घाबरला आणि त्याने एटीएममधून पन्नास हजार रुपये काढून त्यांना दिले. पैसे हातात आल्यानंतर आरोपी मोटारीसह पळून गेले. यानंतर योगेशने आसपास झालेल्या अपघातांबाबत माहिती काढली. यात आपली फसवणूक झाल्याचे त्याला समजले आणि त्याने शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यानंतर खंडणी विरोधी पथक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेताना योगेशला लुटणारा आरोपी गिरी असल्याचे समोर आले. सोबतच तो पाषाण – सुसगाव येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार आपला सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सुरेश गिरी हा सराईत गुन्हेगार असून त्यावर पिंपरी- चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण हद्दीत चोरी, जबरी चोरी, खंडणी, व फसवणुकीचे एकूण १७ गुन्हे दाखल आहेत.

Leave a Comment