शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार पिकविमा रक्कम; सरकारकडून कंपन्यांना 406 कोटी रुपये वितरीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारकडून चालू करण्यात आलेली “एक रुपयात पिकविमा” योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिश्याचे तब्बल 406 कोटी रुपये विमा कंपन्यांना वितरित केले आहेत. मुख्य म्हणजे, राज्यातील 1 कोटी 70 लाख 67 हजार शेतकऱ्यांनी यावर्षी पिकविमा भरला आहे. राज्य सरकारकडून वितरित करण्यात आलेली रक्कम साधारणता 20 ऑक्टोंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाईल. शेतकऱ्यांनी पिकविमा भरल्यामुळे एकूण सव्वाकोटी शेतकऱ्यांचा विमा संरक्षित रकमेतील 25 टक्के रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यावर्षी राज्यातील 1 कोटी 40 लाख 97 हजार हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली होती. मात्र पेरणीनंतर काही काळ पाऊसच पडला नाही. ज्यामुळे राज्यातील जवळपास 800 हून अधिक महसूल मंडळांमधील पिकांना त्याचा फटका बसला. त्याचबरोबर पाण्याअभावी पिकांचे उत्पादन देखील कमी झाले. या सर्वबाबी लक्षात घेऊन राज्य सरकारने कंपन्यांना विम्याची 406 कोटी रक्कम वितरित केली आहे. त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम पाठवली जाईल. या सर्व शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 25 टक्के पिकविमा मिळणार आहे.

दरम्यान, राज्यातील नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये 25 सप्टेंबर पर्यंत सरासरी चार्ट 40 टक्के ही पाऊस पडलेला नाही. तर दुसरीकडे 588 मंडळांमध्ये 15 ते 21 दिवस पाऊसच पडला नाही. त्यामुळे राज्यातील 15 जिल्हाधिकाऱ्यांनी भरपाईसंदर्भात अधिसूचना काढली होती. मात्र विम्याची रक्कम सरकारकडूनच विमा कंपन्यांना न मिळाल्यामुळे कंपन्या देखील शांत होत्या. मात्र आता सरकारकडून ही रक्कम विमा कंपन्यांना वितरित केली आहे. त्यामुळे आता पुढील महिन्यात शेतकऱ्यांना त्यांची भरपाई मिळेल.