जिल्हा हादरला ! सावत्र बापाकडूनच मुलीवर अत्याचार, आईचेही होते समर्थन

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशातच जिल्ह्यातून बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका नराधम सावत्र बापाने आणि त्याचे मित्राने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. इतकंच नाही तर नराधम बापाने आणि तिच्या आईनं पीडित मुलीला वेदना देखील दिल्या आहेत. लैंगिक अत्याचाराची परिसीमा गाठणारी ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात घडली आहे. दरम्यान या घटनेनंतर पीडित मुलाने वैजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी नराधम सावत्र बाप, त्याचा मित्र आणि जन्मदात्या आईविरोधात बाल लैंगिक प्रतिबंधक कलमासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर औरंगाबाद जिल्हा हादरून गेला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गेल्या एक महिन्यांपासून नराधम सावत्र बाप आणि त्याचा मित्र पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत होते. धक्कादायक म्हणजे या कुकृत्याला पीडितेच्या आईचं समर्थन होतं. तिनंही कधी विरोध केला नाही. आरोपी राजू लक्ष्मण सोळसे, सतीश कनगरे आणि पीडित मुलीची आई अशी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सावत्र बापाला अटक केली आहे. मात्र, या गुन्ह्यातील दुसरा आरोपी सतीश कनगरे आणि पीडितेची आई अद्याप फरार आहे. पोलिस दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.

माहितीनुसार, पीडित मुलगी औरंगाबाद शहरात शिक्षणासाठी वसतिगृहात राहात होती. मात्र, कोरोना काळात ती घरी आली होती. गेल्या एक वर्षांपासून पीडिता आई-वडिलांकडे राहत होती. दरम्यान, सावत्र बापानं तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला. इतकंच नाही तर आरोपीच्या मित्राने देखील पीडितेवर बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे पीडित मुलीच्या आईचं नराधमांना या कृत्यात समर्थन होतं. पीडितेनं विरोध केला असता तिच्या गुप्तांगात मिरची पूड देखील टाकण्यात आली. त्यानंतर पीडित मुलीनं आपल्या मावशीला आपबिती सांगितली. पीडिता आणि तिच्या मावशीनं वैजापूर पोलिस स्टेशन गाठून झालेला प्रकार सांगितला. पोलिसांनी तिन्ही आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून इतर दोघांचा शोध घेण्यात येत आहे.