हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| 1961 च्या आयकर कायद्यानुसार, ज्या करदात्याचे उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा जास्त अधिक आहे, अशा व्यक्तींना इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरणे बंधनकारक आहे. त्यानुसार, 2024-25 साठी आयकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. परंतु या तारखेच्या आत रिटर्न भरल्यास करदात्यांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे करदात्यांना मुदतीपूर्वी रिटर्न भरणे फायदेशीर ठरेल.
कोणाला रिटर्न भरावे लागतील??
जर तुमचे उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 31 जुलैपर्यंत रिटर्न भरावे लागेल. आयकर विभागाने रिटर्न भरण्यासाठी ITR फॉर्म जारी केला आहे. नोकरदार करदात्यांना रिटर्न भरण्यासाठी फॉर्म 16 घ्यावा लागेल. तर, नियोक्त्यानी 15 जूनपर्यंत फॉर्म 16 जारी करणे आवश्यक आहे. परंतु तुम्ही जर पगारदार करदाते असाल तर तुमच्या कंपनीने फॉर्म 16 जारी केला आहे की नाही ते तपासून घ्या.
अंतिम मुदतीपर्यंत रिटर्न भरला नाही तर??
जर तुम्ही अंतिम तारखेपर्यंत आयकर रिटर्न भरले नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. परंतु, विभागाकडून अंतिम मुदतीनंतर रिटर्न भरण्याची सुविधा प्रदान केली जाते. त्यापूर्वी तुम्हाला दंड ही भरावा लागतो. जर एखाद्या करदात्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपर्यंत असेल तर त्याच्याकडून 1,000 रुपये दंड आकारला जाईल. तर वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर 5000 रुपये दंड आकारला जाईल. तसेच, करदात्यांना कराच्या रकमेवर दरमहा 1 टक्के व्याज द्यावे लागेल.