सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 2 हजार 65 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 827 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 26 हजार 165 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 31 हजार 199 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 1 हजार 991 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 2962 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर मंगळवारी दिवसभरात 51 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तात्पुरते स्थगित ः विनय गाैडा
सद्या 45 वर्षावरील नागरिकांचे की ज्याचा पहिला डोस देण्यात आला आहे. परंतु सद्य:स्थितीत जास्त प्रमाणात त्यांना दुसरा डोस देणे बाकी आहे. लस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने दि. 13 मे 2021 पासून 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांचे कोविड-19 लसीकरण पुढील आदेश पर्यंत तात्पुरते स्थगित करण्याचे शासनस्तरावरुन सुचित करण्यात आले असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? http://bit.ly/3t7Alba