व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

आमदारांच्या स्थानिक विकास निधीत वाढ; तब्बल ‘इतक्या’ कोटींचा मिळणार निधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आला आहे. त्यामध्ये विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांच्या विकास निधीत १ कोटी रुपयांची वाढ केली जाणार आहे. त्यामुळे सध्या आमदारांच्या असलेल्या ३ कोटी विकास निधीत वाढ होऊन तो ४ कोटी करण्यात आला आहे.

राज्याच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न असलेल्या स्थानिक विकास निधीचा तो मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सन 2020-21चा अर्थसंकल्प सादर करताना स्थानिक विकास निधीमध्ये वाढ करण्यात येईल अशी घोषणा केली होती.

स्थानिक विकास निधीसाठी फेब्रुवारी महिन्यात अर्थमंत्री अजित पवार यांनी निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार आमदारांना स्थानिक विकासासाठी 3 कोटी रुपये देण्यात येत होते. त्यात आता अजून एक कोटींची वाढ करण्यात आलेली आहे. एकंदरीत ठाकरे सरकारने दिवाळीपूर्वी राज्यातील आमदारांना मोठ्या प्रमाणात विकास निधीत वाढ करून एकप्रकारची भेटच दिली आहे. सरकारच्या या निर्णयाचे आमदारांकडून स्वागत होत आहे.