हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रस्त्यावरील एका कुत्र्याने अवघ्या ७ महिन्याचा मुलाच्या प्रायव्हेट पार्टचा चावा घेतल्याची घटना कोटा शहरात घडली आहे. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला आहे. सदर मुलाला जेके लॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून तो जीवन मरणाशी संघर्ष करत आहे.
सदर 7 महिन्यांचा मुलगा घरात साडीच्या झुल्यात झोपला होता. यादरम्यान घराचा उघडा दरवाजा पाहून रस्त्यावरील एक कुत्रा घरात घुसला. त्याने दाताने साडीची झूल फाडली. त्यानंतर निष्पाप मुलावर हल्ला करून मुलाच्या प्रायव्हेट पार्ट चा चावा घेतला. त्यानंतर मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याचे वडील मुकेश आणि त्याची पत्नी धावत आले.
रक्तबंबाळ अवस्थेत होत बाळ
मुलाच्या आई वडिलांनी तात्काळ त्या कुत्र्याला तेथून हाकलून लावलं पण तोपर्यत ते बाळ रक्तबंबाळ अवस्थेत होत. पीडित बाळाला तातडीने कोटा येथील जेके लोन रुग्णालयात नेले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जेके लोन हॉस्पिटलच्या बालरोगतज्ञांनी सांगितले की, कुत्रा चावल्यानंतर 24 तासांच्या आत रेबीज प्रतिबंधक लस आणि रेबीज इम्युनोग्लोबिन लागू केले जाते. वेळेवर अँटी रेबीज लस आणि रेबीज इम्युनोग्लोबिन पूर्णपणे सुरक्षित आहेत.