औरंगाबाद | केंद्र शासनाने 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू केले. तेव्हापासून शहरात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्या प्रमाणात लसींचा पुरवठा होत नसल्याने पालिकेच्या लसीकरण मोहिम वारंवार स्थगित होत आहे.
मनपाच्या लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत पाच लाख 23 हजार नागरिकांना लस मिळाली आहे. लसीचा साठा मुबलक प्रमाणात नसल्याने केवळ एक लाख 55 हजार नागरिकांनी दोन डोस घेत लसीकरण पूर्ण केले आहे. उर्वरित नागरिकांना दुसरा डोस घ्यावा लागणार आहे यातील सुमारे 40 हजार नागरिकांची दुसऱ्या डोसची मुदत जवळ आलेली आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून आलेला लसींचा साठा दोन दिवसात संपत असल्यामुळे 40 हजार नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाकडून कधी 10 हजार तर कधी 6 हजार लस मिळत असून प्राप्त एका दिवसातच संपत आहेत लसींचा पुरवठा होत नसल्यामुळे दुसऱ्या डोससाठी 40 हजार नागरिक वेटिंगवर आहेत.