धनुष्यबाण कोणाला? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर धनुष्यबाण गमावण्याची वेळ आली आहे.

काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला होता. आमच्याकडे ४० आमदार आणि १३ खासदार असल्याचा दावा शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केला होता. दोन्ही गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निकाल राखून ठेवला होता. अखेर आज याबाबत निकाल देत आयोगाने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे.

शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह हे दोन्हीही एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानं आता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण मिळणार आहे. दरम्यान, हा भारतीय घटनेचा आणि बाळासाहेबांच्या विचाराचा विजय आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असत असं म्हणत हा सत्याचा विजय आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.