शिवजन्मोत्सवाचा उत्साह; 10 हजार स्क्वे. फुटांच्या रांगोळीतून साकारली शिवछत्रपतींची प्रतिमा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

शिवजन्मोत्सवा निमित्य परभणी जिल्ह्यामध्ये उत्साहाचे वातावरण असून विविध उपक्रम व कार्यक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवभक्त सज्ज झाले आहेत . यावेळी सेलू मध्ये हेलीकॉप्टर मधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाथरी शहरामध्ये ज्ञानेश्वर बर्वे व इतर कलाकारांचा संचाने मिळून शहरातील देवनांद्रा शाळेच्या मैदानावर सुमारे 10 हजार 392 स्क्वेअर फुट अशी भव्य शिवछत्रपतींची रांगोळीतून प्रतिमा साकारली आहे तर मानवत शहरांमध्येही भव्यदिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यामध्ये यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व करत असताना कोरोना संसर्गाच्या नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असल्याचे ठिकठिकाणच्या शिवजयंती समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

सेलू मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व छत्रपती संभाजीराजे भोसले ट्रस्टच्या वतीने १९ फेब्रुवारी शनिवार रोजी सकाळी १० वाजता शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष छगन शेरे यांनी दिली. दरवर्षी भव्य दिव्य व आगळ्यावेगळ्या स्वरूपात साजरा होणारा सेलूतील शिवजन्मोत्सव सोहळा यंदा देखील आकर्षित ठरणार आहे. यंदाच्या शिवजन्मोत्सव सोहळ्यावर कोव्हीड १९ संकट असुन शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून हा सोहळा पडणार आहे.

आयोजकांनी मिरवणुकीला फाटा देत शिवछत्रपतींना अभिवादन सोहळा करुन शिवजन्मचा पारंपरिक पाळणा होईल व त्यानंतर स्टेशन रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड व माजी आ. विजय भांबळे यांच्या शुभहस्ते हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. हा दिमाखदार सोहळा यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष छगन शेरे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सर्जेराव लहाने, राम मैफल इंजि. भास्करराव कोलते, रामराव बोबडे, शरद मगर, शरद ठाकर, वसंत बोराडे रामराव गायकवाड, गोविंद काष्टे , राजेंद्र हुलसुरे, बाबासाहेब पावडे, दामोधर काकडे, बजरंग आरकुले, राम शेरे, विशाल गव्हाडे, शशांक टाके, महेश मुसळे, कृष्णा रोडगे, संतोष शिंदे, सचिन रोडगे, निलेश शिंदे, अर्जुन चव्हाण, माधव गव्हाणे शरद घोरपडे आदी परिश्रम घेत आहेत.

या मान्यवरांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी …

हेलिकॉप्टरच्या तीन राऊंड मधून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड, माजी आ . विजयराव भांबळे, लक्ष्मी नृसिंह साखर कारखान्याचे चेअरमन संजय धनकवडे, उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार, कंत्राटदार आर . बी . घोडके, संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष छगन शेरे, तहसीलदार दिनेश झापले, डॉ . बाळासाहेब जाधव, मराठा सेवा संघाचे तालूकाध्यक्ष सर्जेराव लहाने, सचिव रामराव मैफल आदी मान्यवरांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.