ऊसाच्या फडातून बिबट्याची तीन्ही पिल्ले मादीने नेली

Leopard Cub
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
वनवासमाची येथे दोन दिवसापूर्वी सोमवारी दुपारी बिबट्यांची 3 आढळली होती. त्यापैकी मंगळवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मादी बिबट्याच्या एका पिल्लाला घेऊन गेली होती. त्यानंतर कालच सायंकाळी 7 वाजता दुसरे तर तिसरे पिल्लू मादीने पुन्हा बुधवारी पहाटे 2. 55 मिनिटांनी नेले. सदरचा प्रकार वनविभागाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाल्याने शेतकऱ्याच्यात भीतीचे वातावरण आहे.

कराड तालुक्यातील वनवासमाची येथे स्मशानभूमी शेजारी प्रकाश यादव यांच्या शेतात ऊसतोड सुरू होती. या दरम्यान बिबट्याची 3 पिल्लं आढळून आली. त्यानंतर मजूरांनी ऊसतोड बंद ठेवली होती. या घटनेची माहिती कराड वनविभागास दिल्यानंतर वनधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी शेतकरी तसेच स्थानिकांना काही सूचना दिल्या होत्या. रेस्क्यूचे श्रीनाथ चव्हाण, हर्षद व डॉ. कल्याणी यांनी सर्व पिल्लांची वैद्यकीय तपासणी करून ते सुस्थितीत असल्याची खात्री केली. त्यानंतर बिबट्याची पिल्ले तेथेच एका कॅरेटमध्ये ठेवण्यात आली होती. वनविभागाने पिल्लं सापडलेल्या ठिकाणी उसाच्या रानात पुन्हा एका कॅरेटमध्ये ठेवली. पिलांचे मूत्र हे रानात विविध ठिकाणी मादीला पिलांचा वास यावा म्हणून शिंपडले.
गेल्या 24 तासात तिन्ही बिबट्याची पिल्ले मादीने नेली आहेत. बिबट्याची मादी (आई) पिलांपासून ताटातूट झाल्यामुळे रागीट (अग्रेसीव aggressive) होऊ नये म्हणून पिल्लांचे अन् मादीचे मिलन करण्यात आले.

उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल सागर कुंभार, वनरक्षक दीपाली अवघडे, अभिजीत ,
व स्थानिक रोहित कुलकर्णी, अजय महाडिक, योगेश शिंगण आदीच्या मदतीने बिबट्याची पिल्लांची व मादीची भेट घडवून आणण्यात आली.