व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रातील जतमधील 40 गावांवर कर्नाटक ठोकणार दावा; मुख्यमंत्री बोम्मईं नेमकं काय म्हणाले,

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. अशा परिस्थितीत आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एक वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. “महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावावर दावा करण्याचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत. आमचे सरकार महाराष्ट्रातील कन्नड-माध्यमांच्या शाळांना अनुदान देईल. आम्ही जत तालुक्याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला असल्याचे बोम्मई आणि म्हंटले आहे.

सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक व महाराष्ट्र सीमाप्रश्नी बुधवारी होणारी सुनावणी पुढे ढकलन्याय आली असताना आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्याने अजून एक वाद वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी थेट महाराष्ट्रातील काही गावांवर आपला हक्क सांगितल्याने महाराष्ट्रातील जनतेकडून त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्र सरकारने कर्नाटक व महाराष्ट्र सीमप्रश्नी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य अतिथीगृह सह्याद्री येथे काल उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची कर्नाटक सीमा वाद प्रकरणी कायदेशीर लढाई प्रक्रियेत समन्वय साधण्यासाठी नियुक्ती करण्यात आली. बैठक घेतल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आक्रमक झाले असून त्यांनी सुप्रीम कोर्टात आमची बाजू मांडण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत, असेही सांगितले आहे.

मुख्यमंत्री बोम्मई काय म्हणाले,

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी नुकताच माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आमचे कर्नाटक सरकार महाराष्ट्रातील कन्नड-माध्यमांच्या शाळांना अनुदान देईल आणि शेजारच्या राज्यात राहणाऱ्या कन्नडिग स्वातंत्र्यसैनिकांना निवृत्तीवेतनही देईल. त्यासाठी आम्ही आवश्यक कागदपत्रे गोळा करत आहोत. आम्ही जत तालुक्याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे.