संरक्षण प्रमुख बिपीन रावत यांचे निधन; राजनाथ सिह यांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तामिळनाडूच्या कुन्नुरमध्ये आज दुपारी लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून या हेलिकॉप्टरमधून एकूण चौदाजण प्रवास करत होते. दरम्यान, या घटनेनंतर रावत यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात होते. उपचारादरम्यान रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी व तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची माहिती मिळताच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बिपीन रावत याच्या निधनानंतर मी दुःखी झालो आहे, अशी प्रतिक्रया सिह यांनी दिली आहे.

कुन्नुरमध्ये झालेल्या अपघातानंतर सीडीएस बिपीन रावत व त्यांच्या पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंग्टन येथील आर्म्ड फोर्सचं महाविद्यालयात एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. तिथून ते कुन्नूरकडे निघाले होते. ते तिथून दिल्लीला जाणार होते. मात्र, घनदाट जंगलात ही दुर्घटना घडली. या घटनेत रावत यांच्यासह तेरा जणाचा मृत्यू झाला असून वरून सिह याच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, दुपारी केंद्रीयमंत्री संरक्षण मंत्री राजनाथ सिह यांनी लष्कर अधिकाऱ्यांशी बैठक घेत या दुर्घटनेची माहिती घेतली होती. तसेच याबाबतची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व राष्ट्र्पतींनाही दिली होती. या दुर्घटनेची माहिती घेतल्यानंतर मंत्री सिह यांनी अधिकारी रावत यांच्या घरी जाऊन सुमारे पंधरा मिनिटे कुटूंबीयांशी चर्चा केली होती.